निवडणूक आयोगाने बोगस वोटर बाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन करणार
१६९ बोगस मतदारांना बाजूला करा
सिंधुदुर्ग : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे हे भाजपाकडून लढत आहेत. त्यांच्या घरात मुसलमान वोटर नोंद असल्याचा पुरावा समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाला तर मुस्लिम समाज चालतच नाही, मग अशा वेळेला हे मतदार आले कुठून? फक्त या दोन-तीन मुसलमानांचा विषय नाही, हे मुसलमान तर समीर नलावडे यांच्या घरी राहत असल्याचे दाखवले गेले आहेत. ते त्यांच्या घरी राहतात का ? जर राहत नसतील तर ते इतके वर्ष कुठे होते ? आताच ते मतदार यादी मध्ये कसे आले ? 169 मतदारांचा हा जो काही गठ्ठा आहे तो या निवडणुकीमध्ये समीर नलावडे यांच्याच प्रभागामध्ये कसा वाढला ? त्यामुळे मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून कारवाई न झाल्यास मी आंदोलन करणार आहे. अन्यथा मतदानाच्या बुथवर उभा राहून बोगस मतदारांना रोखणार असल्याचा इशारा, शिवसेना आ. निलेश राणे यांनी दिला आहे.
मालवण येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या बोगस मतदारांबाबत मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आपण याच्यावरती कारवाई करुन मला निर्णय द्यावा, इलेक्शन 9 ते 10 दिवसांनी आलेले आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी सुट्टीवर आहेत. आम्ही कोणाकडे दाद मागायची? जरी सुट्टी असली तरी सोमवारी मी हा विषय हाताळणार आहे. गरज पडली तर मी आंदोलनाला बसणार आहे. आणि जेव्हा ज्या दिवशी मतदान होईल . त्यादिवशी बूथ वर संघर्ष करावा लागला तर त्या मतदारांना थांबवायचं काम मी करणार असल्याचा इशारा आ. निलेश राणे यांनी दिला.