8.8 C
New York
Friday, November 21, 2025

Buy now

कणकवलीत प्रभाग ७ मध्ये बोगस मतदार नोंदणीचा गंभीर प्रकार आमदार निलेश राणे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या संदर्भात कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, कणकवली यांना लेखी पत्र देत चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, प्रभाग क्र. ७ मधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. समिर अनंत नलावडे (घर क्र. ३८९) व त्यांची पत्नी सौ. सुप्रिया समिर नलावडे (घर क्र. ४२२) यांच्या पत्त्यावर प्रत्यक्षात वास्तव्य नसलेल्या दोन मुस्लिम कुटुंबांसह तब्बल २० पेक्षा अधिक व्यक्तींची नावे मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत.

तसेच प्रभागातील अनेक घरांचे क्रमांक प्रत्यक्षात नसताना त्या पत्त्यांवर मतदार दाखविण्यात आल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी केवळ दुकाने अथवा गाळे असतानाही २० ते २५ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ज्या घरांत प्रत्यक्षात दोन ते तीन व्यक्तीच राहतात, त्या घरांत मोठ्या प्रमाणात नावे दाखल केल्याचेही पत्रात नमूद आहे. या संदर्भातील पुरावे आणि यादी आमदार राणे यांनी पत्रासोबत जोडली आहे.

या सर्व गैरप्रकाराला संबंधित BLO (बी.एल.ओ) यांची निष्काळजीपणा आणि तपासातील त्रुटी कारणीभूत असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. मतदारांची वास्तव्य पडताळणी करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून त्याकडे गंभीरपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कारवाईची मागणी :

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून बोगस मतदार नोंदणी करणाऱ्या तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच सादर केलेल्या पुराव्यानुसार अवैध नावे तत्काळ मतदार यादीतून वगळावीत, अशी ठाम मागणी आमदार निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

या प्रकरणामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील मतदार यादीची विश्वसनीयता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता या दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!