महापुरुष मंदिरात महापुरुषाला घातले साकडे
शहर विकास आघाडीचा प्रभाग १७ मध्ये दमदार प्रचाराचा शुभारंभ
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच कणकवलीत राजकीय समीकरणांना वेग आला असून भाजपाविरोधात उभी राहिलेल्या शहर विकास आघाडीने आता प्रचाराला गती दिली आहे. प्रभाग क्र. १७ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कनकनगर येथील महापुरुष मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. नारळ वाढवून विधिवत सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेत कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्साह पाहायला मिळाला. यानंतर घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करण्यात आला. नागरिकांनीही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या प्रचार फेरीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी सुशांत नाईक, राजू शेट्ये, संतोष परब, विलास जाधव, रणजित धुमाळे, किरण वर्दम, समीर सावंत, सुधाकर काजरेकर, संदेश जाधव, साई मोर्ये, संतोष सावंत, निलेश जाधव, प्रतीक रासम, कमलेश नारकर, संकेत कुडतरकर, दया परब, प्रतीक्षा साटम, मीनल म्हसकर, नंदिनी धुमाळे, शैलजा धुमाळे, वनीता सामंत यांचा समावेश होता.