कणकवली : प्रभाग क्रमांक ९ मध्ये अपक्ष उमेदवार मधुरा मालंडकर – वाळके यांच्या प्रचाराची सुरुवात सोमवारी अक्षरशः सणासुदीच्या उत्साहात झाली. सौरभ संदेश पारकर यांच्या हस्ते नारळ वाढवून मोहिमेला शुभारंभ झाला, आणि त्या क्षणापासून संपूर्ण परिसरात प्रचाराची लगबग, घोषणांचा जल्लोष आणि कार्यकर्त्यांचा जोश दिसू लागला.
सकाळपासूनच मधुरा मालंडकर – वाळके यांच्या निवासस्थानी समर्थकांची रेलचेल सुरू होती. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरातील मतदारांनी उमेदवारांना शुभेच्छा देत उपस्थिती लावली. दिलीप मालंडकर, वैभव मालंडकर, दीपाली मालंडकर, सुधानंद उर्फ बंडू राणे, निलेश पवार, संजय सावंत, लक्ष्मी सुतार, सोमनाथ पाडगावकर, संजना चव्हाण, बाळू मालंडकर, प्रियांका मालंडकर, अविनाश चव्हाण, अमित वाळके, आकीश कांदळकर यांसह वैभव मालंडकर मित्रमंडळ मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
प्रचाराच्या प्रारंभीच उमेदवारांच्या समर्थनार्थ घोषणांचा गजर सुरू झाला. ‘प्रभाग ९ साठी बदल हवा…!’, ‘मधुरा ताई पुढे चला…!’ अशा घोषणांनी वातावरण रंगून गेले. कार्यकर्त्यांनी गल्लीबोळांत फेरी काढत प्रचार सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रभागात सुरू झालेल्या या रंगतदार मोहिमेने निवडणूक वातावरण तापवले असून आगामी निवडणुकीत मधुरा मालंडकर – वाळके यांना मतदारांकडून उल्लेखनीय प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.