आमदार निलेश राणेंची घोषणा
प्रामाणिकपणे काम करा यश नक्कीच मिळेल
उपस्थितांना दिला विश्वास
कणकवली : कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांचे आज कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत माजी आमदार व शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली यांच्या कणकवलीतील नंदीश या निवासस्थानी काही वेळापूर्वीच जल्लोषात स्वागत करत आगमन झाले. या ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणालाही घाबरू नका वेळ आली तर कधी हाक मारा निलेश राणे तुमच्या सोबत आहे. संदेश पारकर यांना शंभर टक्के विजयी करणार अशी घोषणा त्यांनी या बैठकीदरम्यान केली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेले काही दिवस कणकवली शहरातील राजकीय वातावरण तापले असून, कणकवली शहर विकास आघाडी च्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला पर्यायाने पालकमंत्री नितेश राणे यांना घेरण्याच्या दृष्टीने रणनीती आखली जात आहे. व या रणनीतीचा एक भाग म्हणून आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार निलेश राणे यांचा कणकवली दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे शिवसेनेचे नेते व ठाकरे शिवसेनेचे नेते तसेच या दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी एकाच ठिकाणी आले आहेत. त्यामुळे बहुदा राज्यात शहर विकास आघाडीच्या बॅनर खाली शिंदे व ठाकरे यांची शिवसेना निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना फुटी नंतर एकाच व्यासपीठावर आलेली ही बहुदा पहिलीच वेळ असणार आहे. कणकवली च्या राजकीय इतिहासात हा क्षण नोंद केला जाणार आहे. कणकवली शहर विकास आघाडी ही जरी या सर्व घडामोडी मागे असली, तरी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांना रोखण्याच्या दृष्टीने ही एक रणनीती असल्याचे देखील बोलले जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शहर विकास आघाडीच्या मुद्द्यावर आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याची भूमिका घेतली होती. तर त्यानंतर आज सावंतवाडी मध्ये झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान शहर विकास आघाडी बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील त्यांनी जर शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला असेल तर त्यांनी प्रचाराला उतरलेच पाहिजे. आम्ही असतो त्या पक्षामध्ये शंभर टक्के असतो. अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे एकूणच राज्याचे या आजच्या होणाऱ्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याकडे लक्ष असणार आहे. या कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व कणकवली शहर विकास आघाडी पॅनलचे उमेदवार संदेश पारकर, शहर विकास आघाडीचे उमेदवार संकेत नाईक, दीपिका जाधव, माझी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, स्नेहा वाळके, सुमेधा अंधारी, उमेश वाळके शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी शेखर राणे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, माजी नगरसेविका वैशाली आरोलकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रभाग क्रमांक 10 च्या उमेदवार शितल मांजरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेस जिल्हा पदाधिकारी नागेश मोरये, सुशील आळवे, शहर विकास आघाडीच्या उमेदवार साक्षी आमडोसकर, स्नेहा वाळके, सावी अंधारी, लूकेश कांबळे, श्रेया पारकर, सुजित जाधव, बाळु पारकर, प्रमोद मसुरकर, शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ पारकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत.