आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल
मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत
कणकवली : आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उबाठाचे आखवणे शाखाप्रमुख रवींद्र गुरव, भोम शाखाप्रमुख संतोष पडवळ, महीला शाखाप्रमुख संजीवनी गुरव, राजेश गुरव, संदीप पाटेकर, मंगेश गुरव, संदीप गुरव, व अन्य कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
यावेळी किशोर कांबळे, श्रीधर फोंडके, ज्ञानेश्वर फोंडके, सुशील कदम, उदय पांचाळ, शांतिनाथ गुरव तसेच भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.