कणकवली : कणकवली शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह सर्व १७ प्रभागांतील उमेदवारांनी आज कणकवलीचे ग्रामदैवत स्वयंभूचे दर्शन घेत निवडणूक प्रक्रियेची औपचारिक सुरुवात केली. दर्शन घेतल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना आणि प्रचाराला प्रारंभ करताना ग्रामदैवताकडे शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याची प्रार्थना करण्यात आली.
दर्शनानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी व जल्लोष करत उत्साहात वातावरण रंगवले. या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, समृद्धी पारकर, दिवाकर मुरकर, शेखर राणे, साक्षी आमडोस्कर, हर्षद गावडे, तेजस राणे यांसह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.