भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक
कासार्डे – विजयदुर्ग मार्गावर दुर्घटना
कणकवली / तळेरे (प्रतिनिधी ) : कासार्डे – विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक नागरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत. मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव हे दोघेही जीगरी मित्र होते.हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.