कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी शहर विकास आघाडीची घोषणा केल्यानंतर आता शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीचे 17 नगरसेवक पदाचे उमेदवार सोमवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संदेश पारकर व शहर विकास आघाडीचे उमेदवार कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिर येथे दर्शन घेऊन तेथून कणकवली तहसील कार्यालया बाहेर शक्तीप्रदर्शन करत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
तरी शहर विकास आघाडीच्या पाठीशी राहणाऱ्या मतदारांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले आहे.