9.4 C
New York
Sunday, November 16, 2025

Buy now

विकासाच्या मुद्द्यांवर नगरपंचायत निवडणूक लढवणार आणि जिंकणार – समीर नलावडे

कणकवली : कणकवली नगरपंचायतीची निवडणूक भाजप पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही भाजप पक्षाच्या माध्यमातून मागील काही वर्षांत शहरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनमत मागत आहोत. शहरवासीयांचे जनमत भाजपला मिळणार आहे. ३ डिसेंबरला निकालाच्या दिवशी भाजपचे सर्व उमेदवार विजय होऊन न. पं.वर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केला.
समीर नलावडे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. नलावडे म्हणाले, नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून मी उमेदवारी तर नगरसेवकपदासाठी १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचे आशीर्वाद घेऊन मी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मागील काही वर्षांपासून कणकवली नगरपंचायतीवर खा. नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे नेतृत्वाखाली भाजपची सत्ता होती. सत्तेच्या काळात राणे व चव्हाण यांच्या माध्यमातून शहरात आम्ही विकासात्मक कामे करून कणकवलीचे रुपडे पालटले. यावर्षीच्या निवडणुकीत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतदारांकडे मत मागत आहोत, जनता ३ डिसेंबरला भाजपच्या हाती पुन्हा सत्ता देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यांनी केले नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

नगरसेवक पदासाठी भाजपकडून प्रभाग ३ मधून स्वप्निल राणे, प्रभाग ४ मधून माधवी मुरकर, प्रभाग ५ मधून मेघा गांगण, प्रभाग ६ स्नेहा अंधारी, प्रभाग ७ सुप्रिया नलावडे, प्रभाग ८ मधून गौतम खुडकर, प्रभाग १२ मधून मनस्वी ठाणेकर, प्रभाग १४ सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, प्रभाग १५ विश्वजित रासम, प्रभाग १६ संजय कामतेकर, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!