कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. कोण नगराध्यक्ष? कोण नगरसेवक? यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज भाजपकडून महत्त्वाची हालचाल झाली. नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे यांनी नामांकन दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेवक पदासाठी गौतम खुडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
नामांकनावेळी डॉ. विठ्ठल कदम, महेंद्र जाधव, प्रकाश कदम, गौतम हिंदळेकर, अजय जाधव, किरण जाधव, सुशील कदम, तुकाराम फोडेकर, कमलाकर जाधव, सुभाष कदम, मानसी कांबळे, विनायक तांबे, सुनयना कासले, अस्मिता कासले, वंदना तांबे, प्रांजल खुडकर, प्रदीप खुडकर, सायली कासले, संजना कासले, मानसी खुडकर, प्रज्ञा खुडकर, रुपेश कदम, दिलीप खुडकर यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उमेदवारी दाखल केल्यानंतर गौतम खुडकर म्हणाले,
भारतीय जनता पार्टीने ही जागा लढवण्यासाठी मला उमेदवारी दिली आहे. वॉर्ड क्रमांक ८ मधील समाजाच्या विविध समस्या, विकासकामे आणि रखडलेली कामे नगरपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी जनतेतील उमेदवार आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणींची मला पूर्ण जाण आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा मला निवडून दिले, तर विकासकामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.