संपूर्ण जिल्ह्याचे संदेश पारकर काय बोलणार याकडे लक्ष
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अशातच कणकवली कडे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. नेहमीच चर्चेत राहिलेले उमेदवार म्हणजे संदेश पारकर. अनेक दिवस संदेश पारकर कोणत्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करणार कि शहर विकास आघाडी पुढे येणार असे अनेक प्रश्न प्रश्न चिन्हातच असताना आज सायंकाळी संदेश पारकर कणकवली येथे आपल्या निवासस्थानी ४:३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. एकूणच या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.