महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी दुकान बंद करावं तसं बिहारमध्ये काँग्रेसने ‘दुकान बंद करावं’
खासदार नारायण राणे
कणकवली : बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रथमतः अभिनंदन. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे मोठा विश्वास दाखवत त्यांना प्रचंड बहुमत दिले आहे.
या विजयावर प्रतिक्रिया देताना रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,
बिहारमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. आता काँग्रेसने दुकान बंद करावं. त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाही. महाराष्ट्रात जसं उद्धव ठाकरे यांनी दुकान बंद करावं, तसंच बिहारमध्ये काँग्रेसनेही दुकान बंद करावं.
खा. नारायण राणे पुढे म्हणाले, आमचे विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत. आता तरी त्यांनी हे विरोधाचं राजकारण थांबवलं पाहिजे. बिहारच्या निकालातून विरोधकांनी धडा घ्यावा. जनता विकासाला मतदान करत आहे हे पुन्हा सिद्ध झालं आहे.