संदेश पारकर पुन्हा नगराध्यक्षपदाच्या रिंगणात
कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे नाव चर्चेत होते. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, संदेश पारकर हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्याची माहिती हाती आली आहे.
संदेश पारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने शहराच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. पारकर पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या निर्णयामुळे आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.