कणकवली : आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी कणकनगर – शिवशक्तीनगर येथील युवकांनी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी अनादी साईल, साहिल परब, प्रथमेश पांगम, ओंकार पांगम, विकास पांगम, सुयोग कदम, भार्गव रायकर, प्रथमेश शिंदे, योगेश बाईत, रोहित जाधव इत्यादी युवकांनी प्रवेश घेतला.