कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शहर विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सायंकाळी ४ वाजता संदेश पारकर यांची पत्रकार परिषद होणार आहे.
या पत्रकार परिषदेत पारकर नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत निवडणुकीतील पुढील राजकीय दिशा या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.