4.3 C
New York
Wednesday, November 12, 2025

Buy now

कणकवलीत महायुती की भाजप-राष्ट्रवादी युती?

ढालकाठीतील कमानीवरील फोटो हटल्याने राजकीय चर्चांना उधाण

कणकवली :
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने ढालकाठी येथे सुरू केलेल्या प्रचार कार्यालयासमोरील कमानीवरील बॅनरमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.

या कमानीवर सोमवारी महायुतीतील प्रमुख नेत्यांचे — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, मंगळवारी या कमानीवरून शिंदे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटविण्यात आले.

नवीन बॅनरवर भाजप नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला साईडलाइन करून भाजप-राष्ट्रवादी अशी युती होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले की, “तो बॅनर नजरचुकीने लावला गेला. महायुतीबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. काही उत्साही कार्यकर्त्यांनी राज्यस्तरीय महायुतीच्या प्रोटोकॉलनुसार बॅनर लावला होता. मात्र लक्षात येताच तो बदलण्यात आला. महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत,” असे ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच सावंतवाडीतील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, खासदार नारायण राणे यांनी मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढावी, अशी भूमिका घेतली आहे.

कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जवळ येत असताना या कमानीवरील फोटो बदलामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!