कणकवलीत शहरविकास आघाडी झाल्यास विचार करु
आमची लढाई भ्रष्टाचारी
सत्ताधा-यांविरोधात
कणकवली : महायुती मधले दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते फक्त सत्तेसाठी
एकत्र आलेले आहेत. तेव्हा विचारासाठी नाही. कालच्या विधानसभा आणि लोकसभा
निवडणुकीमध्ये त्यांना माहिती होतं की आपण एकत्र आलो नाही तर सत्ता येणार नाही. तसेच आर्थिक प्रलोभने देवून लोक फोडले नाहीत तर आपल्याला विजय
मिळणार नाही. म्हणून कालच्या निवडणुकीमध्ये जरी त्यांनी विजय मिळवला असला
तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याची ताकद नाही. शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार
नाही. परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केल्यास
कणकवली नगरपंचायतीमधील भष्टाचार रोखण्यासाठी लढा दिला जाईल , असा इशारा
माजी आ. वैभव नाईक यांनी दिला.
कणकवली येथील विजय भवन येथे माजी आ. वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शहर विकास आघाडीबाबत उबाठाचे उमेदवार किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्या
भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील त्यानंतर शहर विकास आघाडीमध्ये जायचं की स्वतंत्र महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढवायची
याचा विचार वरिष्ठ करतील. परंतु महा
युतीच्या चर्चेमध्ये खा. नारायण राणे यांना कोणी घेत नाही. नारायण राणे
हे या विभागाचे खासदार असताना त्यांना न विचारता विशाल परब यांना भाजपात
घेतले तर शिंदे शिवसेनेमध्ये राजन तेली यांचा प्रवेश झाला. त्यामुळे राणेंच्या शब्दाला राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिलेली नाही, त्यामुळे महायुतीबाबत खा. राणेंनी विधान न केलेलं बरं, असा टोला माजी आ. वैभव नाईक यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हे 5 ते 6 दिवस शेतकऱ्यांना दु:ख पुसण्यासाठी दौरा करत आहेत. सरकारने जी मदत जाहीर केली , ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याकडे खा. राणेंनी बघितलं पाहिजे. ज्या ज्या नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आहेत त्या सत्तांधाराच्या विरोधात त्या ठिकाणीच सगळे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेंगुर्ले येथे कॉंग्रेसने नगराध्यक्ष जाहिर
केला आहे. मात्र , महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून निर्णय होईल. खरं तर शिंदेंचे आमदार हे भाजपाच्या ताकतीवरच निवडून आलेले आहे. आज शिंदे यांची कार्यकर्ते जिथे हवा भरत फिरत आहेत. तसं शिंदेंचा पक्ष हा ठिसूळ झालेला पक्ष आहे. त्याला कुठलेही भविष्य नाही. त्यांची युती होईल की नाही
ते त्यांची भूमिका ते जाहीर करतील. आम्ही मात्र सत्ताधारांच्या विरोधात कस लढता येईल यासाठी आम्ही आमचे उमेदवार लवकर उमेदवार जाहिर करणार आहोत.
सत्ताधारी पक्षांनी विकासाच्या बाबतीत ज्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांमध्ये कुठलाही निधी आणला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे . जनतेला ते रोजगार देऊ शकले नाही . मुंबई गोवा हायवे, चीपी विमानतळ सगळे प्रश्न अपुऱ्या अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांचे
नुकसान झालेले आहे, त्यावर कोणी बोलत नाही. त्यामुळे या सत्ताधा-यांच्या विरोधात जनता असल्याचे माजी आ. वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
संदेश पारकर यांनी पुन्हा निवडणूक लढवावी जनतेचा आग्रह
संदेश पारकर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राहीलेले आहेत. त्यामुळे सर्वांचीच भूमिका आहे की ,संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे रहावे. या शहरामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, तो दूर व्हावा ही लोकांची धारणा आहे. लोकांनीं संदेश पारकर यांचे नाव सुचवले
आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे.