भाजपात की शिंदे गटात? — उद्या होणार अंतिम निर्णय
कणकवली : कणकवली नगरपंचायत 2025 ची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विविध पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, उमेदवारांची हालचालही वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, एका युवा नेत्याच्या पक्षप्रवेशाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. हा युवा नेता कोणत्या पक्षात प्रवेश करणार — भाजपात की शिंदे गटात — याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही.
मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, उद्यापर्यंत या पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, अधिकृत घोषणा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात या निर्णयामुळे नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्गात या युवा नेत्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे