महिला सक्षमीकरणासाठी शासनाचे अनेक धाडसी निर्णय
सर्व योजना महिलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणाऱ्या
प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी असंख्य योजनामुळे
वैभववाडी येथे महिला मेळावा संपन्न : मोठ्या संख्येने महीलांची उपस्थीती
वैभववाडी प्रतिनिधी :
महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना महिलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणा-या आहेत. शासनाच्या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढविण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या मेळाव्याला भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बॅंक संचालक दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, गटविकास रामचंद्र जंगले, माजी सभापती जयेंद्र रावराणे, दिगंबर पाटील, वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, सीमा नानिवडेकर, शारदा कांबळे, वैशाली रावराणे, स्नेहलता चोरगे, अनुज्ञा अंगवलकर, नेहा माईंणकर, संगीता चव्हाण व महिला पदाधिकारी, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी नितेश राणे म्हणाले, मोदी साहेबांनी मागील दहा वर्षात घेतलेले निर्णय महीलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणारे आहेत, परदेशी वस्तूवर अवलंबून न राहता देशाला स्वतःच्या ताकदीवर महासत्ता बनविण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांचे आहे. यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या असंख्य योजना तळागाळापर्यंत राबविण्यात येत आहेत. लखपती दीदी, मुख्यमंत्री लाडकी बहीण यासारख्या असंख्य योजनांचा पुरेपूर फायदा समाजातील महिलांना होत आहे. या योजनामुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. या योजना बंद होणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून ५५ कोटींची उलाढाल होत आहे. दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांनी सक्षम बनले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात उमेद माॅल उभा करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पहिल्या पाच मध्ये आपला मॉल असेल असे नितेश राणे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली उत्पादने पोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच मंत्रालयात बचत गटांसाठी खाद्य महोत्सव घेणार असे सांगितले. यावेळी नितेश राणे म्हणाले, महिलांना हार्दिक सक्षम बनवणारे नेतृत्व सत्तेत राहिले पाहिजे. याची काळजी महिला भगिनींनी घेतली पाहिजे. नेतृत्व राहिलं नाही तर योजना बंद पडेल असे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पदावर राहिले पाहिजेत असे नितेश राणे यांनी सांगितले. उमेद हे माध्यम आहे. उमेदच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम उभा आहे असे नितेश राणे यांनी सांगितले. शितल पुंड म्हणाल्या, एक लाख उद्योजिका निर्माण झाल्या पाहिजेत. उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. महीलांनी स्वतः मेहनत घेतली पाहिजे. नवीन गट तयार करा, दुसऱ्यांना मदत करा, चांगल्या उद्योजिका बना असे सांगितले. संध्या तेरसे म्हणाल्या, माता भगिनी सक्षम व्हाव्यात यासाठी आत्मनिर्भर अभियान सुरू आहे. शेवटच्या घटकातील माणूस आर्थिक आत्मनिर्भर व्हावा यासाठी नरेंद्र मोदीजी प्रयत्न करत आहेत. छोटे-मोठे उद्योग निर्माण करा, महिला सक्षम तर कुटुंब सक्षम, प्रत्येक व्यवसाय जबाबदारीने व कष्टाने उभा करा असे आवाहन त्यांनी केले. वैभववाडी भाजपच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राची तावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शारदा कांबळे यांनी मानले. या मेळाव्याला जवळपास हजारो महिला उपस्थित होत्या.