संघटनात्मक बळकटीसह नव्या कार्यकारिणीची निवड
कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावातील ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वसंमतीने करण्यात आली असून, या कार्यकारिणीमुळे गावातील कला, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांना नवे बळ मिळणार आहे.
या नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष संतोष पुजारे, उपाध्यक्ष निलेश सादये, सचिव निलेश सावंत, खजिनदार विनायक घाडीगांवकर, सह सचिव चेतन सावंत, सहखजिनदार अभिनंदन सादये, प्रचार प्रसिद्धी प्रमुख अनिल घाडीगांवकर, विशेष सल्लागार सुमंगल सावंत, सदस्य मिलिंदआरोसकर, सदस्य सिझर फर्नांडिस, सदस्य रुपेश वायंगणकर, सदस्य स्वप्निल परब, सदस्य संतोष परब, सदस्य मनीष वरवडेकर, सदस्य विवेक राणे यांचा समावेश आहे.
संस्थेच्या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून वरवडे गावात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून युवा पिढीला प्रेरणा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.