बचत गटांच्या सहभागातून साकारला उत्सवी उपक्रम
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रेरणेतून, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून आयोजन
कणकवली (मयुर ठाकूर):
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रेरणेतून आणि माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली शहरात पेट्रोल पंपासमोर बचत गटांचा स्पेशल दिवाळी बाजार सुरू करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजस रेगे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी अर्जुन राणे, माजी नगरसेवक किशोर राणे, अण्णा कोदे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, चारू साटम, संजय कामतेकर, विराज भोसले, प्रद्युम्न मुंज, निधी निखार्गे, सुनील नाडकर्णी, लवू पिळणकर, परेश परब, मनोहर पालयेकर, राजन भोसले, सखाराम सकपाळ, भालचंद्र मराठे, संजीवनी पवार, भारती पाटील, स्मिता कामत, प्रिया सरूडकर, क्रांती लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पेशल दिवाळी बाजारात एकूण ३५ स्टॉल्स उभारण्यात आले असून, दिवाळीच्या फराळापासून ते घरसजावटीच्या साहित्यापर्यंत विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महिलांच्या बचत गटांना आपल्या उत्पादनांची थेट विक्री करण्यासाठी व ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बाजार परिसर दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघाला आहे. रंगीबेरंगी सजावट, घरगुती फराळ, आकर्षक दिवे, रांगोळी साहित्य, तसेच पारंपरिक हस्तकला वस्तूंमुळे संपूर्ण बाजारपेठ सणासुदीच्या उत्साहाने उजळून निघाली आहे.