जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, यांच्या हस्ते करण्यात आले.
या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथालयात आलेली नवीन पुस्तके तसेच, दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्तलचे ग्रंथप्रदर्शन 15 ते 17 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग येथे सर्वासाठी मोफत खुले राहिल. तरी वाचक, सभासद, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांनी आयोजित प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, यांनी केले आहे.