17.9 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी घ्यावयाची दक्षता

सिंधुदुर्गनगरी : सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती तेल इत्यादीची मागणी मोठ्याप्रमाणात केली जाते, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायीकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) मा.रा. घोसलवाड यांनी केले आहे.

आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने व किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल प्राप्त करून घ्यावा. तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकूण ठेवावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करतांना केवळ फूडग्रेड साद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (100 PPM पेक्षा कमी). अन्न पदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकींग करताना वर्तमान पत्राचा वापर करू नये. बंगाली मिठाई हि 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. मिठाई बनवितांना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॅप्रन वापरावे. मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे. मिठाई हाताळतांना हात वारंवार स्वच्छ धुवावे. अन्न व्यवसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा. आस्थापनेत कार्यरत अन्न हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्याचा अभिलेखा ठेवावा. अन्न आस्थापनेत 25 कर्मचाऱ्यांच्या मागे 1 असे Fostac training प्राप्त Food Safety Supervisor नियुक्त करावा.
जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी वरीलप्रमाणे नमुदकेलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात मिठाई व इतर अन्न पदार्थाच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच अन्न पदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तकार असल्यास ते प्रशासनाच्या टोल फ्री कमांक – १८०० २२२ ३६५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अन्न व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!