न्यायालयीन कोठडीत रवानगी
कणकवली : विवाहितेचा विनयभंग
केल्याप्रकरणी संकेत शांताराम चौगुले (२५, रा. फोंडाघाट, बाविचे भाटले) याला कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली होती. पीडित विवाहिता आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत होती. त्यावेळी संशयित संकेत याने तिचा विनयभंग केला, अशी फिर्याद विवाहितेने पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार संशयितास ९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.