16.8 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

माईण येथे शेतातून परतणाऱ्या शेतकऱ्यासह आईलाही दुखापत

कणकवली : माईण – नांदगाव रस्त्यावर म्हारके देवळाजवळ ओमनी गाडीचालकाने शेतकऱ्याला अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी तसेच त्याची आई जखमी झाली असून कणकवली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

ही घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास १.२० वाजता घडली. पांडुरंग धोंडु घाडीगावकर (वय ४२, रा. माईण गावठणवाडी) हे आपल्या आई सुनिता घाडीगावकर यांना शेतातून घेऊन घरी परतत होते. त्या वेळी समोरून येणाऱ्या ओमनी गाडीने (क्रमांक अज्ञात) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांनी गाडी बाजूला थांबवली.

यानंतर संबंधित ओमनी थांबली असता, घाडीगावकर यांनी चालकाला धडक का दिली याबाबत विचारणा केली. त्यावरून वाद होऊन ओमनी चालक अनिल बागवे (रा. भरणी) याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याने पांडुरंग घाडीगावकर यांचा डावा हात ओढून त्यांना खाली पाडले व त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत केली. दरम्यान, आई सुनिता घाडीगावकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर दोघांनीही रिक्षाने कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावून तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पांडुरंग यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचे, तर त्यांच्या आईच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कणकवली पोलिसांनी या प्रकरणी अनिल बागवे (रा. भरणी) याच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!