कणकवलीतील शिवाजीनगर येथील घटना
कणकवली : शहरातील शिवाजीनगर परिसरात इमारतीखाली उभी करून ठेवलेली टीव्हीएस कंपनीची एंटॉर्क दुचाकी चोरीस गेल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेतील कर्मचारी अनिल तुकाराम तांबे (वय ५६) हे माऊली दर्शन अपार्टमेंट, शिवाजीनगर, कणकवली येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) सायंकाळी त्यांनी आपली दुचाकी इमारतीखाली पार्क केली होती. मात्र रविवारी सकाळी (दि. १२ ऑक्टोबर) त्यांनी पाहिले असता गाडी त्या ठिकाणी नव्हती.
सर्वत्र शोधाशोध करूनही दुचाकीचा मागोवा लागला नसल्याने तांबे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरीस गेलेली गाडी टीव्हीएस एंटॉर्क ( MH-07-AP-7049 ) अशी आहे.
सदर गाडी आढळून आल्यास कणकवली पोलीस ठाणे ( दूरध्वनी क्र. ०२३६७ – २३२०३३ ) किंवा अनिल तांबे ( मो. ९४२२३९४५५४ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.