कुडाळ : पोखरण बौद्धवाडी येथील नागरिकांची दीर्घकाळाची मागणी असलेल्या साकव बांधकामाला गती मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
या साकव बांधकामाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. स्थानिक ग्रामस्थांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार निलेश राणे यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाला मंजुरी मिळाली आहे. संबंधित कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून बांधकामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.
या साकवाच्या उभारणीमुळे पोखरण बौद्धवाडी परिसरातील ग्रामस्थांना ये-जा सुलभ होणार असून पावसाळ्यातील अडचणींनाही मोठा दिलासा मिळणार आहे.