16.2 C
New York
Sunday, October 12, 2025

Buy now

3 वर्षांच्या ‘नृत्या’ची दुर्मिळ – गंभीर आजाराशी झुंज | मदतीचं आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी येथील तीन वर्षांची चिमुरडी नृत्या महेश जांभोरे ही अतिशय दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाच्या निमोनिया या आजाराशी झुंज देत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर सुरू असलेल्या महागड्या उपचारामुळे जांभोरे कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तिच्या वडिलांनी, नृत्यदिग्दर्शक श्री. महेश जांभोरे यांनी, कलावंत मित्रमंडळाच्या माध्यमातून समाजाला मदतीचे कळकळीचे आवाहन केले आहे.

गंभीर आजार आणि वाढता खर्च

नृत्यावर गेले ८ ते १० दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत समाधानकारक सुधारणा न झाल्याने तिला तातडीने कोल्हापूर येथील “साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल” मध्ये हलवण्यात आले आहे. आतापर्यंत उपचारांसाठी दोन लाखाहून अधिक खर्च झाला आहे, आणि कोल्हापूरमध्ये सध्या डॉक्टरांकडून सर्वात महागडी (लास्ट स्टेजची) उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे.

नृत्याच्या उपचाराचा खर्च दररोज वाढत असून, सद्यःस्थिती लक्षात घेता हा खर्च १० ते १५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. नृत्य क्षेत्रात कोरिओग्राफर म्हणून काम करणारे तिचे वडील महेश जांभोरे यांना वाढता खर्च परवडणारा नाही. नृत्याने जन्माच्या पहिल्या वर्षापासूनच अनेक आजारांशी लढा दिला असून, त्यावेळीही तिच्या उपचारांवर कुटुंबाने बरीच पूंजी खर्च केली आहे. २५ सप्टेंबरच्या आसपास नृत्या अचानक अस्वस्थ झाली आणि तातडीने दाखल केल्यावर तिला निमोनिया झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून तिची जगण्याची धडपड सुरू आहे.

कलाकार मित्रमंडळाचे आवाहन

महेश जांभोरे, मूळचे नंदुरबारचे असून, सावंतवाडीत आतेकडे राहून त्यांनी मिळेल ते काम करत शिक्षण घेतले आणि नृत्य कलेची उपासना केली. त्यांनी कधीही कोणाकडे मदत मागितली नाही. मात्र, पोटच्या मुलीच्या जीवासाठी आणि वाढत्या खर्चापुढे हतबल झाल्याने त्यांच्या मित्र परिवाराने हे मदतीचे आवाहन केले आहे.

प्रत्येक दानशूर व्यक्तीने आपल्या परीने मदत करावी, जेणेकरून नृत्यावर तातडीने उपचार सुरू राहतील.

बैंक खातेः

IFSC: SBIN0000476

Account No: 20300618631

Google Pay (महेश जांभोरे): 9545472152

नृत्याच्या उपचारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे, राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी कागदपत्रांसंबंधी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी साद प्रवीण कुबल (7066415169)

महेश जांभोरे आणि मित्रपरिवार यांनी घातली आहे. आपण सर्व सुज्ञ आहातच, त्यामुळे नक्कीच

परमेश्वराच्या रूपात माझ्या मुलीसाठी तुम्ही धावून याल,” अशी भावनिक साद घातली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!