नागपूर : विदर्भ महसूल सेवक संघटना व महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना (माजी कोतवाल संघटना) यांच्या वतीने नागपूरमधील संविधान चौकात दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाचे स्वरुप अद्याप कायम आहे. मागणींसाठी झालेल्या आंदोलनात विदर्भ महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र बोदेले आणि राज्य उपाध्यक्ष श्री. योगेश शेडमाके यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून, ते गेल्या चार दिवसांपासून उपोषणात आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल त्वरित वैद्यकीय लक्ष देण्याची विनंती करण्यात येत आहे.