15.4 C
New York
Sunday, October 12, 2025

Buy now

कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण जाहीर

१७ प्रभागांची आरक्षणे जाहिर ; महिलांना मोठी संधी

विराज भोसले, सुशांत नाईक, बंडू हर्णे यांचे प्रभाग दुसऱ्या घटकांसाठी आरक्षित

कणकवली : राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची आरक्षण सोडत बुधवारी येथील नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली. नवीन आदेशानुसार यावर्षीपासून आरक्षण निश्चित
करण्यात आले आहे.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र नानचे, महिला पोलीस विनया सावंत यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नव्याने जाहिर झालेल्या आरक्षणात माजी नगरसेवक विराज भोसले, सुशांत नाईक, बंडू हर्णे यांचे प्रभाग दुसऱ्या घटकांसाठी आरक्षित झाले आहेत.

सदरची आरक्षण सोडत शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. १ सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ६ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ८ अनुसूचित जाती, प्रभाग क्र. ९ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १० सर्वसाधारण, प्रभाग क्र. ११ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्र. १२ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १३ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. १५ सर्वसाधारण, प्रभाग क्र. १६ सर्वसाधारण, प्रभाग क्र. १७ सर्वसाधारण

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!