13.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

१५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कणकवलीत दिवाळी बाजाराचे आयोजन

नाम. नितेश राणे यांच्याहस्ते होणार १५ ऑक्टोंबर रोजी उद्घाटन

कणकवली : भाजप पुरस्कृत समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने १५ ते १९ ऑक्टोंबर या कालावधीत दिवाळी बाजार भरवण्यात येणार आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीकरांनी ही नगरपंचायत दिल्यानंतर हा उपक्रम सलग आठव्या वर्षी दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली शहरात बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करीत आहेत. त्यांना व्यासपीठ देण्यासाठी दिवाळी बाजार भरवत आहे. दिवाळी फराळ या बाजारात विक्री करता येणार आहे. १५ ऑक्टोंबर रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, अभिजित मुसळे, सोमा गायकवाड, किशोर राणे, गौरव हर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.

या दिवाळी बाजारात कुंभार समाजातील हाताने तयार केलेली भांडी आहेत, त्यांना १० स्टॉल राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील बचतगट लोकांसाठी ३० स्टॉल आहेत. त्या महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तू असाव्यात दुकानातील माल पाहून विक्री करता येणार नाही. या बाजारात ४० स्टॉल असतील. त्या सर्वांना लागणारी टेबल, खुर्चा, लाईट मोफत व्यवस्था दिली जाणार आहे. हा दिवाळी बाजार ऑटो रिक्षा चालक मालक गणपती प्रतिष्ठापना होते, तिथे होणार आहे. १५ ऑक्टोंबर रोजी नाम. नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार उद्घाटन होणार आहे. १९ ऑक्टोंबर पर्यंत हा बाजार राहणार आहे. सर्व व्यवस्था स्टॉल धारकांना मोफत सेवा देण्यात येणार आहे. या बाजारासाठी नाव नोंदणी शहराध्यक्ष अण्णा कोदे ९४२२३८१९००,८२०८८२८६८६ यांच्या कडे करा, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!