13.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठा वर मोठा घाव! तालुका प्रमुख मंगेश लोके सह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश

उबाठा ला मंत्री नितेश राणे यांचा जोरदार धक्का!

वैभववाडी तालुक्यातून उबाठा सेना नेस्तनाबूत,

तालुकाप्रमुख मंगेश लोके सह सरपंच,सदस्य, व शेकडो कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी भाजपात केला पक्ष प्रवेश

मंत्री नितेश राणे यांनी पक्षात केले स्वागत.!

शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा भाजप जिल्हा कार्यालयात झाला भव्य पक्ष प्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन भाजपात पक्ष प्रवेश;मंगेश लोके

खांबाळे सरपंच प्राजक्ता कदम, खांबाळे विकास सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड यांनीही केला पक्ष प्रवेश

ओरोस : वैभववाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावला. उबाठा चे तालुकाप्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबतच वैभववाडी तालुक्यातील उभाठा च्या अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी खांबाळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अशा शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वैभववाडी तालुक्यातील मुख्य भाजपात आला आहे. या पक्षप्रवेशा दरम्यान श्री.मंगेश लोके यांनी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रेरित होऊन हा प्रवेश करत आहोत. विकास करण्याची क्षमता मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आहे.वैभववाडी तालुका आणि खांबाळे गाव विकासाच्या टप्प्यावर पुढे जावा, आणि म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे श्री लोक यांनी जाहीर केले.

यावेळी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केलेल्या मध्ये खांबाळे गावातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त खांबाळे सरपंच प्राजक्ता प्रसाद कदम, खांबाळे विकास सोसायटी चेअरमन प्रविण सिताराम गायकवाड,सेवानिवृत्त कॅप्टन राजाराम महादेव वळंजु,माजी सरपंच तथा ग्रा. प. सदस्य गौरी गणेश पवार,ग्रा. पं. सदस्य रसिका राजेंद्र पवार, माजी चेअरमन तथा संचालक दिपक शंकर चव्हाण, माजी सरपंच संजय पुंडलिक साळुंखे, विठोबा धाकू सुतार, संचिता सुदर्शन गुरव, सारीका सत्यवान सुतार, राजेंद्र बळीराम देसाई,संचालक प्रसाद वसंत कदम,माजी संचालक प्रमोद दत्तात्रय लोके माजी ग्रा. पं.सदस्य नंदकुमार एकनाथ पवार, विशाखा विलास पाताडे, अशोक वासुदेव पवार जेष्ठ शिवसैनिक महेश प्रकाश लाजवळ, वैभव लवू पवार,परेश पढरीनाथ साइल, प्रकाश राजाराम सुतार, शंकर मोहिते, संदेश संतोष निग्र, अंकिता एकनाथ पवार, राजेंद्र धोंडू पवार, संजय काशिराम पवार, मंगेश तुकाराम कांबळे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रामचंद्र मालू कांबळे,दिपक आत्माराम कांबळे, नितेश ललित जाधव,सुजल गौतम कांबळे, सहदेव गुणाजी कांबळे,शांताराम तुकाराम कांबळे,समीर सदानंद जाधव, अरुण तुकाराम माळकर, सज्जन वसंत मोहिते, मारुती काशीराम करपें , राजश्री रामकृष्ण माळकर,शिवाजी ब्रम्हदेव माळकर, तुकाराम आप्पा वापीलकर,गणेश सदाशिव पवार, प्रकाश आकाराम लाजवळ, कमलाकर दत्ताराम मोहिते, प्रियांका कमलाकर मोहिते, रविंद्र कृष्णा मोहिते,प्रमिला प्रकाश लांजवळ,विलास बाबाजी मोहिते,अंजली अशोक पवार, रेणुका रवींद्र सुतार,रविंद्र राजाराम सुतार,लक्ष्मी वासुदेव सुतार, वासुदेव राजाराम सुतार, विजय महादेव मोहिते, सुनिता शिवाजी पवार, दर्शन चंद्रकांत पवार, सुदर्शन सदाशिव गुरव, पांडुरंग आत्माराम परब
प्रमिला पांडुरंग परब, प्रकाश कृष्णा पवार, रेखा अनंत परब,रोहित प्रकाश पवार,रामदास गंगाराम पवार, बबन दत्ताराम पवार, श्रीकृष्ण सिताराम पवार, उत्तम पांडुरंग साळुंखे,विलास बळीराम साळुंखे, नामदेव यशवंत साळुंखे
प्रविण वामन साळुंख,अजय रमेश साळुंखे, थाडू पाडुरंग, साळुंखे,प्रदिप उत्तम साळुंके दिपक शंकर दळवी, वासुदेव पांडुरंग साळुंखे
प्रमिला प्रदिप देसाई,प्रभाकर सखाराम पाताडे. राजश्री रामचंद्र गुरव,बळीराम भिकाजी पवार
हर्षदा प्रविण पालकर,प्रविण दिलीप पालकर, योगेश गोपाळ पवार,सुनिल राजाराम गुरव अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बॅंक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा महिला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, प्रदेश कार्यकारणी सदस्या संध्या तेरसे, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिगंबर पाटील, बंड्या मांजरेकर, देवानंद पालांडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॉक्स
*विकासासाठी झटणारे मंगेश लोके भाजपात– नितेश राणे*
वैभववाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रियपणे काम करणारे मंगेश लोके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी त्यांनी गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाची मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण,खासदार नारायण राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रवेश केला.

श्री.लोके यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि ताकद भाजपाला आगामी निवडणुकांत निश्चितच लाभदायी ठरेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!