सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : ठाकरे शिवसेनेत असलेले माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात आज ते आपल्या हातात शिवधनुष्य घेणार आहेत. याबाबत त्यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांनी दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमधून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्या ठिकाणी त्यांना निवडणुकीत अपयश आले. त्यानंतर ते गेले काही दिवस राजकीय अज्ञातवासात होते. ते नेमके काय करतील? याबाबत प्रश्नचिन्ह होते. परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काही वेळात त्यांचा प्रवेश होणार आहे.