ओवळीये (मालवण) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा–२ अंतर्गत “स्वच्छता ही सेवा २०२५ : महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ” या मोहिमेनुसार “स्वच्छोत्सव” पंधरवड्याच्या निमित्ताने २५ सप्टेंबर रोजी ओवळीये गावात भव्य महाश्रमदान पार पडले.
शाळा–अंगणवाड्यांत स्वच्छता मोहीम; ग्रामस्थांचा मोठा सहभाग
या मोहिमेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये क्र.१, क्र.२, जंगमवाडी क्र.३ तसेच कोलेरीवाडी व जंगमवाडी येथील अंगणवाड्यांच्या आवारात स्वच्छता करण्यात आली.
गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा सेविका, सी.आर.पी., बचत गट महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले.या उपक्रमातून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्वांनी केला.