कणकवली : दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ मधील कलम २३ अन्वये जिल्हास्तरावरील दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १२ वाजता पंचायत समिती, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा समितीचे सदस्य-सचिव, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या पत्रानुसार ही बैठक दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे पार पडणार आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांच्या विविध तक्रारी व अडचणी ऐकून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असून, आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली समस्या मांडावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.