13.9 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्वर-मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मिठमुंबरी यांच्यावतीने नवरात्री निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते समई नृत्याचे झाले उद्धाटन

देवगड – न्यू एनर्जी श्री मुंब्रेश्वर-मुंब्रादेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मिठमुंबरी यांच्यावतीने नवरात्री उत्सवनिमित्त मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते मुंब्रादेवी मंदिरात समई नृत्याचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी कुणकेश्वर गावचे उद्योगपती अरविंद वाळके, युवासेना तळेबाजार शहर प्रमुख लोकेश माणगावकर उपस्थित होते.

मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सन्मान करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्या दिल्या, चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात. या गावच्या विकासासाठी आमचे युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर हे नेहमीच कार्यतत्पर असतात. मिठमुंबरी गावचा पर्यटन म्हणून विकास करण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वेळोवेळी मदत करू असे आश्वासन यावेळी नाईक यांनी दिले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष नीळकंठ गावकर, सेक्रेटरी अमित तोडणकर, खजिनदार आनंद गावकर, कार्याध्यक्ष विशाल तोडणकर, समाधान तोडणकर, स्वप्नील तोडणकर, तेजस गावकर आदी मंडळाचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!