-5.4 C
New York
Thursday, January 29, 2026

Buy now

वागदे सरपंचानी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत केली

सिंधुदुर्ग : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानावर लक्ष देत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

याच आवाहनानुसार, कणकवली तालुक्यातील वागदे गावचे सरपंच संदीप सावंत यांनी आपल्या सरपंच पदाचे एका महिन्याचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले आहे.

सरपंच सावंत म्हणाले की, “राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या मदतीच्या ओघात आपणही भाग घेऊन पूरग्रस्तांना मदत करत आहोत.” श्री. सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर सरपंचांनाही सामाजिक बांधिलकी जोपासत अशा मदतीस पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!