13.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

जखमी गायीचा जीव वाचवण्यासाठी धडपड

गोसेवकांच्या तत्परतेने अखेर मालकाच्या ताब्यात

मालवण :
मालवण शहरात जखमी अवस्थेत भटकत असलेल्या गायीला गोसेवकांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर तिच्या मालकाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. गायीच्या पायाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होत असल्याने तातडीने उपचारांची गरज होती.

सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी ही बाब लक्षात घेऊन वैभववाडी येथील गाय-वासरू गोशाळेशी संपर्क साधला. मात्र गायीच्या वाहतुकीसाठी कोणीही तयार नसल्याने अडचण निर्माण झाली. बजरंग दलाचे सदस्य गणेश चव्हाण व सहकाऱ्यांनी गायीवर लक्ष ठेवले.

शेवटी वैभववाडी खांबाळे येथील गोशाळेचे गोसेवक प्रफुल पवार, निलय शेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःची गाडी घेऊन मालवण गाठले. दरम्यान, गाय मालक ओंकार डोईफोडे यांचा शोध लागला. व्यापारी श्री. राजपूत यांच्या मदतीने जखमी गायीला उपचारासाठी आवश्यक मदत मिळाली व ती सुरक्षितपणे मालकाच्या ताब्यात देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!