ग्रामपंचायत – प्राथमिक आरोग्य केंद्र बैठकीत ऍनिमिया मुक्त कलमठ करण्याचा बैठकीत निर्धार- बैठकीत संदिप मेस्त्री, डॉ रुपाली वळंजू
कणकवली | मयुर ठाकूर :
कलमठ ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 125 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी कलमठ गावातील नागरिकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातील. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कलमठ यांच्यावतीने विशेष मोहीम ऍनिमिया मुक्त कलमठ करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहीती सरपंच संदिप मेस्त्री, डॉ. रुपाली वळंजू यांनी दिली.
या आरोग्य शिबिराचा शुभारंभ सरपंच संदिप मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली वळंजू, आरोग्य सहाय्यक महेश आचरेकर, माजी सरपंच महेश लाड, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, आरोग्य सेवक चंद्रमणी कदम, सामूहिक आरोग्य अधिकारी सुविधा सावंत, ग्रामपंचायत सदस्या स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, सुप्रिया मेस्त्री, सचिन खोचरे,गणेश ऐनार, ऐश्वर्या गावडे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर,संभाजी नांदगावकर,तेजस लोकरे विवेकानंद नेत्रालयचे मानसी पाटणे , ऋत्वीज राणे आदी उपस्थित होते.
या शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, नेत्र तपासणी, एक्सरे, इसीजी, हिमोग्लोबिन तपासणी,रक्त तपासणी, ॲनिमिया तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये एक्सरे- 104, इसीजी- 65, रक्त तपासणी व इतर तपासणी 82, डोळे तपासणी 125 याप्रमाणे कलमठ गावातील नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड 105 जणांचे काढण्यात आले. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.