मालवण : मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मातोश्री श्रीमती नानूबाई ज्ञानदेव जगताप (८५) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर शिंदेवाडी याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कारप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.