-11.2 C
New York
Thursday, January 29, 2026

Buy now

सिंधुदुर्गनगरीतील खड्ड्यांमुळे महिला अधिकारी मृत्यूमुखी

वारंवार लक्ष वेधुनही संबंधीत प्रशासन होते सुशेगात

सिंधुदुर्ग:-सिंधुदुर्गनगरीतील खड्ड्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर या खड्ड्याने जीव घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास डॉन बॉस्को शाळेसमोरील रस्त्यावर मोटारसायकल खड्ड्यात आदळली. मागे बसलेल्या सहाय्यक लेखाधिकारी हेमलता धोंडू कुडाळकर (रहिवासी – कुडाळ) असे त्यांचे नाव असून, त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी गोव्याला नेत असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. कुडाळचे पत्रकार व कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या. त्यांच्या साध्या व मनमिळावू स्वभावामुळे शासकीय वर्तुळात त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या अचानक मृत्यूने जिल्हा परिषदेतील सहकाऱ्यांसह संपूर्ण कुटुंबीय शोकाकुल झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर सिंधुदुर्गनगरीतील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाला आता तरी जाग येईल का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

हेमलता कुडाळकर या जिल्हा परिषदेच्या लेखा आणि कोषागार कार्यालयात कार्यरत होत्या. पतपेढीतील काम आटोपून त्या परत येत असताना त्यांच्या बाईकचा अपघात झाला. डॉन बॉस्कोसमोरच्या रस्त्यावर असलेल्या खड्डयात त्यांची बाईक आदळली आणि बाईकवर मागे बसलेल्या हेमलता कुडाळकर रस्त्यावर फेकल्या गेल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!