बँक प्रमाणे लोगो असलेली APK pdf फाईल पासून सावध राहा
कणकवली : फसवणूकीचे वेगवेगळ्या प्रकारचे फंडे वापरले जात आहे. सावधान सध्या सर्वत्र एपीके पीडीएफ फाईल चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सर्व ग्रुप ना स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ इंडिया असे बनावट नावाचा सिम्बॉल वापरून व्हाट्सअप ग्रुप मधून एपीके फाईल सेंड होत आहे सदर एपीके फाईल ओपन करतात आपला मोबाईल व्हाट्सअप सर्व अकाउंट हॅक होतो. सध्या व्हाट्सअप गृप मधे सदर APK pdf फाईल फिरत आहे.
जो सदर फाईल ओपन करतो त्याचे मोबाईल व्हाट्सअप अकाउंट हॅक होवून त्याच्या मोबाईल वर असलेल्या सर्व मेंबर तसेच गृप मधे त्यांच्याच मोबाईल वरुन सेंड केली जाते. काहींना वाटतं आपल्या मित्रानेच फाईल पाठवली आहे. तर ओपन करुन पहावी. म्हणून ओपन करतात परंतु सदर फाईल ओपन करताच काही तासांतच आपला मोबाईल हॅक होतो. ते त्याला समजून येत नाही. जेव्हा समोरुन फोन येतो