20.4 C
New York
Thursday, September 18, 2025

Buy now

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर ) रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे –

गुरुवारी दुपारी ०१.०० वा. मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, दुपारी ०१.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, दुपारी ०२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०३.२० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०४.०० वा. सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग अंतर्गत दोडामार्ग उपविभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ : ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ), दुपारी ०४.३० वा. राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित दोडामार्ग तालुक्यामध्ये ” सेवा पंधरवडा २०२५” या कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ : दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ) रात्रौ ०८.०० वा. मोटारीने गोव्याकडे प्रयाण, रात्रौ ०९.३० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व राखीव, रात्रौ १०.०५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथून AI Express ( IX – १२०९ ) विमानाने मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ११.२५ वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व मोटारीने जुहूकडे प्रयाण, रात्रौ ११.४५ वा. अधिश निवासस्थान, जुहू येथे आगमन व राखीव.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!