19.8 C
New York
Saturday, September 13, 2025

Buy now

कणकवलीत ऑटो रिक्षा चालक-मालकांचा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना “कणकवलीच्या राजाची” आरती करण्याचा मान

कणकवली : कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक कला क्रीडा मंडळाचा वार्षिक गणेशोत्सव यंदाही दिमाखात पार पडला. सन 1982 साली दिवंगत श्रीधरराव नाईक आणि राजेंद्र रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची स्थापना झाली. त्या वेळी शहरात अवघ्या पन्नास रिक्षा असताना आज सुमारे सहाशे रिक्षा चालक-मालक या संघटनेशी जोडले गेले आहेत. गेली बेचाळीस वर्षे अविरत सुरू असलेल्या या परंपरेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो.

प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना “कणकवलीच्या राजाची” आरती करण्याचा मान देण्यात आला. त्यांनी गणरायाची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतला. भाविकांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा अशी कणकवलीच्या राजाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.

एकवीस दिवस चालणाऱ्या या उत्सवात दशावतारी नाटक, डबलबारी, महिलांसाठी पैठणीचा खेळ तसेच रिक्षा चालकांच्या मुलांच्या गुणवंतांचा गौरव असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या सोहळ्याला ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, उपाध्यक्ष अरुण परब, संतोष सावंत, उदय मोर्ये, मनोज वारे, महेश आमडोस्कर, संदीप घाडी, सरंगले, भरत तळवडेकर, रमेश आरोलकर, रुपेश मगम, सखाराम राणे, दिनेश वराडकर, पेडणेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!