कणकवली : दारूच्या नशेमध्ये जन्म देत्या आईचा खून केल्याची घटना बुधवारी कणकवली तालुक्यात घडली. वारगाव सोरप – सुतारवाडी येथे ही घडली.
या घटनेत जन्म देत्या आईचा मुलाने निर्घृण खून केला आहे. याप्रकणी रवींद्र रामचंद्र सोरप ( वय ४५ ) याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता आरोपी रवींद्र रामचंद्र सोरप याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा गंभीर असल्याने सखोल चौकशी करणे, सदर गुन्ह्यात अजून कोणाचा सहभाग आहे का हे तपासणे तसेच आरोपीची मागील पार्श्वभूमी व खून करण्यामागचे नेमके कारण काय इत्यादी बाबींसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक तेजस नलवडे करत आहेत.