16.6 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

खाजगी बसची धडक, रानबांबुळीत युवक जागीच ठार

घटनास्थळी ग्रामस्थ आक्रमक

तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा

ओरोस : भरधाव जाणाऱ्या खाजगी बसची दुचाकीला धडकेनंतर त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रानबांबुळी येथे मालवण-कसाल राज्यमार्गावर घडली. गणेश चंद्रकांत घोगळे (रा.वराड-हडपीवाडी, ता. मालवण) असे त्याचे नाव आहे. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत संबंधिताला नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. मालवण-कसाल या रस्त्यावर मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणारी आराम बस रानबांबुळी फाट्या जवळील अवघड वळणावर आली असता समोरून कसाल वरून वराडच्या दिशेला जाणारी सुझुकी जिक्सर मोटरसायकल आली असता आराम बसला तिची धडक बसली. यावेळी मोटर सायकल स्वार गणेश हा रस्त्यावर कोसळल्याने त्याच्या अंगावरून बस गेली. तर त्याच्या पाठीमागे बसलेली रुची राजन वालावलकर रा. गावराई तालुका कुडाळ वय २४ ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. त्यामुळे ती वाचली. तिला किरकोळ जखमा झाल्या. तर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात आराम बस रस्त्याच्या खाली उतरली. यामुळे आराम बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. या सर्वांवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात सायंकाळी रविवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची खबर समजतात रानबांबुळी, सुकळवाड, वराड, कट्टा, गावराई, ओरोस सह आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. तसेच सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी शेखर लव्हे यांच्यासह सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र जोपर्यंत आराम बसचा मालक येऊन नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत रस्त्यावरील मृतदेह आम्ही हलवणार नाही, असा पवित्रा वराड ग्रामस्थांनी घेतला. पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र हे सर्व ग्रामस्थ आपल्या म्हणण्यावर ठाम राहत आक्रमकही झाले होते. घटनास्थळी वाढलेली गर्दी पाहता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविला होता. सिंधुदुर्गनगरीसह कणकवली, कुडाळ, मालवण आदी भागातून मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच घटनास्थळी शीघ्रकृती दलाला पाचारण करण्यात आले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!