कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतच्या सहा नगरसेवकांचे केलेले निलंबन आम्हाला मान्य नाही. आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी आम्ही हे निलंबन मान्य करू. अशी प्रतिक्रिया कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी X पोस्टच्या माध्यमातून दिली आहे जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले होते. पक्षातील शिस्तभंगाची कारवाई म्हणून या नगरसेवकांचे निलंबन करत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. याला उत्तर म्हणून आ. निलेश राणे यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
“मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधील सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला त्यादिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील त्यादिवशी हे निलंबन आम्ही मान्य करू. सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय हे खासदार श्री राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही” अशी प्रतिक्रिया आ. निलेश राणे यांनी X पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.