मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास
रो – रो सर्व्हिस ची पहिली चाचणी यशस्वी
सिंधुदुर्ग ( मयुर ठाकूर ) : फार ऐतिहासिक दिवस आपल्या कोकण वासीयांसाठी आहे. या रो – रो सर्व्हिस ची वाट सर्वजण पाहत होतो. त्याची यशस्वी चाचणी झालेली आहे. मुंबई येथून निघालेली रो – रो पहिली जयगड ला थांबली, त्यानंतर विजयदुर्ग नळ थांबलेली आहे. आज सकाळी ती परत मुंबई च्या दिशेने जाणार आहे. दोन ते तीन दिवसात रो रो सर्विस पॅसेंजर ना घेऊन सिंधुदुर्ग कडे येणार आहे. कोकणवासीयांना आपल्या गावाकडे घेऊन जाणे आणि पुन्हा मुंबईकडे घेऊन येणे अशी सोयीस्कर संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रोजगार, व्यापार आणि पर्यटन यामध्ये कोकण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे सुरू झालेली ही रोरो सर्विस कोकणासाठी गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे आले होते. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, सिंधुदुर्ग राजाची प्रार्थना आणि आभार मानण्यासाठी याठिकाणी आलो होतो. सिंधुदुर्ग राजाने आम्हा राणे कुटुंबियांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्यासह आम्हा सर्वांना आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग राजाचे आभार मानण्यासाठी याठिकाणी आलो आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी जे पाठबळ आणि आशीर्वाद पाहिजे ते सिंधुदुर्ग राजाने उभं करावं, अशी प्रार्थना त्यांनी सिंधुदुर्ग राजा चरणी केली.
जे आंदोलन करते होते त्यांची जी जुनी आणि प्रमुख मागणी होती. महाराष्ट्रातील इतिहासामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर जेव्हा जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला आहे ते काम फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत झालेला आहे. २०१४ – १९ या वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले व टिकवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वात जुनी आणि प्रमुख मागणी होती. मात्र जेव्हा जेव्हा मराठा समाजाला पाठिंब्याची आणि आजाराची गरज होती तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये असतात. त्यामुळे मराठा समाजातील तरुण तरुणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजे. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात त्यांना अपशब्द वापरतात तोच माणूस तुम्हाला न्याय देतोय. आरक्षण हा विषय जुना विषय आहे तो आताचा नाहीय. परंतु टिकणार आरक्षण जर पहिल्यांदा राणे समितीच्या अनुसार जर कोणी दिले असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ओबीसी समाजाला न दुखावता मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला. हिंदू समाजाला जातीच्या नावाने हे काही तोडले जात होते ते आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी थांबवून दाखवली.