कणकवली : तालुक्यातील बिडवाडी साटमवाडी येथील सोनाली राजेंद्र साळस्कर (३४) या विवाहितेचा आकस्मिक मृत्यू झाला. सोनाली यांना रविवारी रात्री डोक्यात दुखू लागले. पती राजेंद्र यांनी त्यांच्या कपाळाला बाम लावून दिला. त्यानंतर सोनाली झोपी गेल्या. मात्र सोमवारी सकाळी ७वा. सुमारास राजेंद्र यांनी पाहिले असता सोनाली यांची कोणतीच हालचाल होत नव्हती. परिणामी सोनाली यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील तपासणी अंती सोनाली यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत सोनाली यांचे कुटुंबीय मुकेश लवू साळसकर (४२, बिडवाडी साटमवाडी) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.